Marathi
अॅक्शन फ्रॉड’ ला कोणत्याही फसवणुकीबाबत माहिती द्या
तुम्ही जर फसवणुकीला बऴी पडला असाल, तर तुम्ही ‘अॅक्शन फ्रॉड’ या युनायटेड किंगडमच्या फसवणूक नोंद केंद्राला सांगू शकता. तुम्ही जर यूके मध्ये असाल, फसवणूक यूके मध्ये घडली असेल, किंवा फसवणूक यूकेशी संबंधीत आहे आणि ऑनलाईन घडली असेल, तर तुम्ही कोणतीही फसवणूक ‘अॅक्शन फ्रॉड’ ला कळवू शकता.
तुम्ही इंग्रजी बोलत नसाल, किंवा इंग्रजी ही तुमची मातृभाषा नसेल, तर आम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत फसवणुकीविषयी सांगण्याची संधी देणारी सेवा आमच्याकडे आहे.
- दूरध्वनी +44 300 123 2040.
- तुमच्या कॉलला कोणातरी इंग्रजी बोलणाऱ्याकडून उत्तर दिले जाईल. तुम्ही कोणती भाषा बोलता ते त्यांना तुम्हाला सांगावे लागेल.
- त्यानंतर एखादा अनुवादक बोलवेपर्यंत तुम्हाला थांबण्यास सांगितले जाईल. याला काही मिनिटे लागू शकतात, त्यामुळे कृपया फोन बंद करू नका. आमच्याकडे अनुवादक ताबडतोब उपलब्ध नसेल तर, तुम्हाला तुमचा दूरध्वनी क्रमांक देण्यास सांगितले जाईल आणि अनुवादक उपलब्ध झाल्यावर कोणीतरी तुम्हाला पुन्हा कॉल करेल.
- जेव्हा अनुवादक तुमच्याशी बोलेल, तेव्हा तुमच्या फसवणुकीचा अहवाल तयार करण्यासाठी तो/ती तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगेल. फसवणुकीविषयी कोणतेही कागदपत्र आपल्याजवळ आहेत याची खात्री करा म्हणजे तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकता.
लाईन्स खुल्या असतात:
सोमवार - शुक्रवार: सकाऴी 8 ते रात्री 8 शनिवारः दूरध्वनीः +44 300 123 2040. टेक्स्टफोनः +44 300 123 2050.